Thursday, 12 Dec 2019

वि स खांडेकर प्रशालेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कोल्हापूर: वि. स. खांडेकर प्रशाला शाहूपुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते बाबासाहेब डोने व मुख्याध्यापिका उषादेवी देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .
यावेळी बोलताना बाबासाहेब डोने यांनी महात्मा गांधींनी देशासाठी व मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या महान कार्याचा आढावा घेतला. महात्मा गांधींचा सर्वसामान्य व्यक्तीच्या विकासाचा विचार देशाला तारू शकेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी लालबहादूर शास्त्री यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीचा आढावाही त्यांनी घेतला. अध्यक्ष अध्यक्षीय भाषण मुख्याध्यापिका उषादेवी देशमुख यांनी केले. यावेळी बुलेटिनचे प्रकाशन करण्यात आले नववी अ च्या मुलांची भाषणे यावेळी झाली. सूत्रसंचालन सागर द्राक्षे यांनी केले. आभार कु. मधुरा पवार हिने मानले. कार्यक्रमास पर्यवेक्षिका नेहा कानकेकर , सहसचिव वंदना काशीद, मधुकर भिवोगडे, एस. एस. भोसले आदी मान्यवर व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *