Thursday, 12 Dec 2019

वि स खांडेकर प्रशालेत महात्मा गांधीजींच्या जीवनातील दुर्मिळ पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन

कोल्हापूर : वि .स .खांडेकर प्रशाला शाहूपुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जीवनावर आधारित दुर्मिळ ग्रंथाचे व पुस्तकांच्या प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ग्रंथपाल पी.डी.धनवडे यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाला इयत्ता पाचवी ते दहावी मधील सुमारे एक हजार मुलां – मुलींनी व पालकांनी भेट दिली .प्रशालेच्या पर्यवेक्षिका नेहा कांकेकर, आंतरभारती च्या सहसचिव वंदना काशीद ,ज्येष्ठ शिक्षक मधुकर भिवगडे , समीर जमादार ,अनिल चव्हाण आदी शिक्षक व सर्व विद्यार्थी व शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते .विद्यार्थ्यांना गांधीजींचे जीवनातील अनेक ठळक प्रसंग चित्र रूपात या प्रदर्शनातून पाहण्यास मिळाले .एक अत्यंत चांगली संकल्पना ग्रंथपाल पीडी धनवडे यांच्या परिश्रमातून राबविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *