Thursday, 12 Dec 2019

तुनेशियातील राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार आणि भारतात चिदंबरम यांना तुरुंगात का टाकले?

भारताचे माजी गृहमंत्री व अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना या आठवड्यामध्ये तिहार जेलमध्ये भेटायला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग गेले होते .सुप्रसिद्ध वकील व काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी दिल्ली हायकोर्ट ला विनंती केली की 74 वर्षांच्या या वयोवृद्ध नेत्याला घरचे जेवण देण्याची मुभा असावी परंतु नियम साऱ्यांना सारखाच असतो असे हायकोर्ट जे सुरेश कुमार यांनी सांगितले (का त्यांना सांगायला लावले ही माहित नाही) 21 ऑगस्टला पी चीदंबरं ना अटक करण्यात आली त्यापासून हा सूडाचा प्रवास चालू आहे.
तूनिशिया मध्ये नवीन करोई हे मेडिया मॅग्नेट आहेत .त्यांना असे वाटले की आपण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहावे म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. मेडिया आणि पैसा ज्याच्याजवळ आहे तो आपल्याला आज ना उद्या धोकादायक आहे असे गणित सत्तारुढ सरकारने मांडल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप ठेवून त्यांना तुरुंगात टाकले आपल्यावर हुकूमशाही पद्धतीचा अन्याय आहे हे नबील यांनी प्रसार माध्यमातून देशभर सांगितले .भारतात चिदंबरम शांतपणे मोदी शहाचा सासुरवास सहन करीत आहेत परंतु ट्युनिशिया चे नविन यांनी अन्यायाविरुद्ध भूख हरताळ सुरू केला आहे त्यांनी अन्नत्याग केलेला आहे .हे देशामध्ये सर्वत्र पसरले राजकीय खुन्नस पोटी या माणसाला जेलमध्ये टाकले आहे म्हणून त्यांचे समर्थक आता देशभर या हिटलरशाही विरुद्ध निदर्शने करीत आहेत त्यामानाने चिदंबरम यांच्या अन्यायाविरुद्ध काँग्रेस कार्यकर्ते गप्प कसे ?अजून तळागाळातून त्याबद्दल उद्रेक कसा झाला नाही ?त्याचे आश्चर्य वाटते. कपिल सिब्बल सारखे मुरलेले वकील असतानाही जज दाद देत नाहीत यामागे सरकारचा प्रचंड दबाव आहे अशी शंका आता नेत्यांच्या प्रमाणे नागरिकांनाही येऊ लागली आहे .
यांच्या वकिलांनी म्हटले आहे की नवीन करोई 56 वर्षाच्या नेत्यावर खोटे आरोप लादून कोर्टावर सरकारने दबाव आणला आहे काही झाले तरी निवडणुका पार पडेपर्यंत त्यांना तुरुंगातून बाहेर सोडू नका असा अलिखित आदेश सरकारने न्यायाधीशाला दिला आहे मात्र ज्या दिवशी अध्यक्षपदाच्या निवडणुका पूर्ण होतील त्या दिवशी कोर्टाने सुनावणी ठेवली आहे त्यानंतर कदाचित त्यांची सुटका होईल देशात लोकशाही आहे असा डांगोरा पिटायचा इकडे निवडणूक आयुक्त, हायकोर्ट ,सुप्रीम कोर्ट वर अंकुश ठेवायचा (कारण त्यांनीच त्यांच्या नेमणुका केलेल्या असतात) आणि मग खोट्या आरोपाखाली विरोधकांना दाबत रहायचे हे धोरण जगात अनेक देशांमध्ये चालू आहे ट्युनिशिया आणि भारत त्याला अपवाद नाहीत. हे अरबांच बंडखोरीचे ठिकाण 2010 2011क्रांतीनंतर मात्र लोकशाही असणारे हा देश आहे अशी प्रसिद्धी झाली प्रसारमाध्यम आणि पैसा हातात असणारा नवीन करुई जसा धोकादायक वाटला तसाच अर्थमंत्री चिदंबरम डॉक्टर मनमोहन सिंग हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ त्यांनी मोदी सरकारचे वाभाडे काढायला सुरू केले देशाची आर्थिक स्थिती कोसळत आहे हे त्यांनी स्पष्ट केले नोटाबंदी ने जीएसटी लादून भारतातील छोटे-मोठे लघु उद्योग धंदे शेती बँका यांची मोदी शहानी वाट लावली. करोडो नागरिक बेकार झाले हे चिदंबरम मनमोहन सिंग सांगू लागले त्याची भीती मोदी शहाना वाटली पण अमेरिकेमध्ये जाऊन देशाला अच्छे दिन आले म्हणून मोदी हाऊ डू यूडू कार्यक्रम घेतला .
याला उपस्थित असणारे लोकांचे एक रहस्य आहे हे विविध कंपन्या तले कर्मचारी असतात त्यांना पगारी रजा देउन कार्यक्रमाला जाण्याची सक्ती केली जाते जणू आपल्याकडे रोजंदारीवर निदर्शक मिळतात किंवा सभा भरवण्यासाठी श्रोते विकत मिळतात तसाच प्रकार मात्र जगातल्या काही परखड वस्तुनिष्ठ मिडीयानी याचा भांडे फोडले आहे हिटलर मोदी असे फलक हातात घेऊन हजारो लोकांनी निदर्शने केली पण भारतीय नागरिकापर्यंत ते येत नाही इतकेच .
पूर्वी इटलीची राजधानी रोम जळत असताना फिडल वाजवणारा नीरो झाला, भारत बेकारीच्या खाईत कोसळत असताना परदेशात स्वतःची पाठ थोपटून घेणारे मोदी यात काहीच फरक नाही असे जागतिक मीडियाला वाटते. ट्युनिशिया अध्यक्ष निवडणुकीत नाबिल तुरुंगात असतानाही निवडून आले तर फासे उलटतील कदाचित निकालापूर्वी त्यांच्यावर आरोप शाबीत झालेत असे दाखवले व त्यांना कार्यालय प्रवेश नाकारला तर मात्र मतदारांच्यात निर्माण होणारा असंतोष देशात राजकीय संकट निर्माण करेल
भारतात तळागाळातल्या माणसाची चुल पेटायचे थांबले त्याचा रोजगार रोजंदार थांबला तो उपाशी राहू लागला तर असंतोषाचा भडका देशाला अराजकाकडे नेइल आणि मोदी शहाना पळता भुई थोडी होईल भारताच्या इतिहासात आता ही दोन नावे फॅसिस्ट, हुकूमशहा ,हिटलर अशा सदराखाली समाविष्ट होतील की काय अशी शंका येऊ लागली आहे पण एक लक्षात येते की या मागे महाभारतातला “न धरी शस्त्र कधि, सांगेन युक्तीच्या गोष्टी चार” म्हणणारा “मोहन” नामानिराळा राहील कारण ती त्यांची कार्यपद्धती आहे. त्यांचा त्यात काय दोष? चांगले झाले माझ्यामुळे वाईट झाले तुझ्यामुळे हे त्यांचे प्रसिद्ध गीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *