Friday, 22 Nov 2019

‘वाचन प्रेरणा दिन’

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून करवीर नगर वाचन मंदिर आणि वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची ओळख व्हावी, मोबाईल युगात बालवयातच त्यांच्या हाती पुस्तके यावीत, ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथाचा खजिना, हस्तलिखिते, ग्रंथ शोध प्रणाली, ब्रेल लिपी यांची ओळख व्हावी या हेतूने ‘चला ग्रंथालयाच्या दिशेने’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे.
या उपक्रमामध्ये ग्रंथालयातील सेवकवर्ग आणि वाचनकट्टा सदस्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे उदघाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे प्र. प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत, शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते होणार आहे. दुसऱ्या सत्रात शिशुविहार शाळेच्या शिक्षिका सौ. वैशाली माने शालेय मुलांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत तर तिसऱ्या सत्रात अरविंद दीक्षित यांचे ‘वाचनाचा व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सदर कार्यक्रम करवीर नगर वाचन मंदिर, भवानी मंडप येथे होणार आहे तरी या कार्यक्रमाला वाचनप्रेमींनी उपस्थित रहावे असे आव्हाहन वाहनकट्टा संकल्पक युवराज कदम आणि ‘कनवा’ च्या ग्रंथपाल मनीषा शेणई यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *