Friday, 22 Nov 2019

एक ध्येय वेडा दीपक…….

मा.डॉ.श्रुती पानसे यांच्या मेंदूशी मैत्री लेखमालेचे संकलन करून ता.भुदरगड , जि.कोल्हापूर येथील १६१ जि.प.प्राथमिक शाळा, ५१ हायस्कूल व ६ खाजगी प्राथ.शाळा येथे Respect to Child नावाचा उपक्रम शाळा भेटी व तपासणी करताना स्वत:चा डबा घेऊन जाणाऱ्या दिपक मेंगाणे, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी सुरू केला आहे. डॉ श्रुती पानसे यांच्या दै. लोकसत्ता मधून प्रकाशित होणाऱ्या मेंदूशी मैत्री लेखमालेतील लेखांचे संकलन करून त्याची हार्ड कॉपी मा. मेंगाणे यांनी शिक्षकांची कार्यशाळा घेऊन सर्व शाळांमध्ये वाटप केली. रोज शिक्षकांमार्फत परिपाठावेळी मुलांसमोर त्याचे क्रमवार वाचन होते.उपक्रमाला बालक, पालक व शिक्षक यांचा उदंड प्रतिसाद पाहून पालक व शिक्षक यांचेसाठी शिक्षणतज्ज्ञ , बालमानसशास्त्रज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ यांची व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. उद्देश हा आहे की मुलांच्या व्यक्तिमत्वाकडे या सर्वांनीआदराने व जाणतेपणाने पाहावे. चार महिन्यापासून सुरू असणाऱ्या या उपक्रमाचे Output पुढील प्रमाणे असल्याचे मा.मेंगाणे यांनी सांगितले.
१) शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचं नातं स
दृढ होण्यास मदत झाली. २) मुलांना समजून घेताना माझं काय चुकायचं ? हे आईला समजू लागलं. ( बाप कधी फारसा अभ्यास घेत नाही.) ३) मुले आईला तू चांगली नाहीस बाई चांगल्या आहेत असं म्हणत. आता आई तू बाईंसारखीच चांगली आहेस असे म्हणू लागलीत.
४) वर्गभेटीवेळी विद्यार्थी विस्तार अधिकारी यांना मेंदू बद्दल अधिक चौकसपणे प्रश्न विचारू लागलेत. ५) सुज्ञ पालक आणि काही सेवानिवृत्त शिक्षकही मेंदूशी मैत्रीचे संकलन घरी घेऊन गेले. ६) काही अंगणवाडी ताईंनी झेरॉक्स काढून घेतल्या. अंगणवाडी मुलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलल्याचे सांगितले. ७)पदाधिकाऱ्यांनी वाचन केल्यावर अचंबित होऊन गावात पालक मेळाव्याचे आयोजन करून वि. अ. यांना मेंदूशी मैत्री या विषयावर सर्व पालकांना मार्गदर्शन करायला लावले. ८) शिक्षकांनी मुलांना समजून घेऊन अध्यापन सुरू केल्याने, अध्ययन- अध्यापन रंगतदार होऊ लागले. विद्यार्थी तणावमुक्त होऊ लागले. शिक्षक स्वतःच्या अध्यापनाचे सिंहावलोकन करू लागले.
९) काही डॉक्टरांनी झेरॉक्स मागून घेतल्या. तालुक्यातील नामांकित डॉक्टर मोमीनसर व डॉक्टर देशपांडेसर यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.
दिपक म्हणजे शिक्षण विभागाला पडलेले सुखद स्वप्न आहे. . माझा वर्ग माझी ओळख हा उपक्रम हा दिपकचा समाजाने, प्रशासनाने गौरविलेला आणखी एक उपक्रम. तालुक्यातील शिक्षकांनी या उपक्रमाद्वारे वर्गात लाखापेक्षा जास्त खर्च केला आहे. वर्गात ग्रंथालय, E- learning, डिजिटल क्लासरूम, बोलक्या भिंती केल्या आहेत. प्रसिद्ध मराठी साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी या उपक्रमाची दखल घेऊन त्याचे महत्त्व अधोरेखित करणारा लेख लोकसत्ता मध्ये लिहिला. महाराष्ट्रातील तमाम बुद्धिजीवी वर्गाने आणि स्वतः मा.शिक्षणमंत्री यांनी त्याची दखल घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमन मित्तल यांनी हा उपक्रम सर्व जिल्ह्यात राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. पुणे येथील यज्ञ परिवार…. या संस्थेने दखल घेऊन शाळा भेटी दिल्या व एक लाख सत्तर हजार रूपये मदतीतून वीस प्राथमिक शाळांना पुस्तकांसाठी बुकसेल्फ व पुस्तके दिली.
शिक्षण विस्तार अधिकारी दिपकने किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड यांनी मा. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या १५० साव्या जयंती निमित्य प्रकाशित केलेल्या ” यांत्रिकाची यात्रा ” पुर्नप्रकाशित पुस्तकाच्या २४० प्रती मोफत मिळवून सर्व शाळेना वाटप केल्या. . भुदरगड प्रज्ञाशोध परीक्षा पहिली/दुसरी उत्कृष्ट नियोजन करून परीक्षा चालू ठेवल्या आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची परंपरा शिक्षकांच्या पाठीवर हात ठेवून अबाधित ठेवली आहे. गेल्या नऊ वर्षापासून विस्तार अधिकारी म्हणून काम करताना एकाही शाळेत भेटावेळी वा तपासणीसाठी जेवण घेतलेले नाही.शाळा भेटीला जाताना स्वत: चा लॅपटॉप घेऊन जातो. नवीन, नाविण्यपूर्ण व वैज्ञानिक माहिती मुलांना दाखवितो. लॅपटॉप शिक्षकांना घेण्यासाठी प्रेरीत केल्याने अनेक शिक्षकांनी लॅपटॉप घेतले आहेत. एक ध्येयवेडा , समाजभान असलेला,स्वच्छ चारित्र्याचा व निष्काम काम करणारा , पारदर्शक व्यक्तिमत्व असलेला विस्तार अधिकारी दिपक मेंगाणे यास अनेक शुभेच्छा व शुभ आशीर्वाद !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *