Friday, 22 Nov 2019

कोल्हापूरमधील पूरग्रस्त कुटुंबांना अँमवेची मदत

शिरोळ तालुक्यामध्ये तसेच आसपासच्या ३००० कुटुंबांना पर्सनल केअर आणि होम केअर किट्स चे वितरण करणार
कोल्हापूर :- महाराष्ट्रात आलेल्या भयंकर पुरामुळे प्रभावित शिरोळ तालुक्यातील व आसपासच्या, ३००० पूरग्रस्त गरीब कुटुंबांना,देशातील अग्रगण्य डायरेक्ट सेलिंग कंपनी अँमवे इंडियाने ३१ लाख किंमतीचे पर्सनल केअर आणि होम केअर किट्स वितरण करून पाठिंबा देण्याचे वचन दिले,पूरग्रस्त कुटुंबांच्या स्वच्छतेच्या आणि वैयक्तिक गरजा भागविण्यासाठी या किट्स मध्ये पर्सोना नारळ तेल,ग्लिस्टर टूथपेस्ट,पर्सोना टूथब्रश पॅक, पर्सोना साबण पॅक आणि लिक्विड ऑर्गेनिक क्लीनर यांसारख्या दैनंदिन वापराच्या पर्सनल केअर उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे.

श्री विजय गोलानी, वाईस प्रेसिडेंट-वेस्ट, अँमवे इंडिया यांनी कोल्हापूर येथे अँमवे डायरेक्ट सेलर्सच्या उपस्थितीत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई यांच्या कार्यालयातून प्रतिकात्मकरित्या किट्सचे वितरण सुरू केले.

या उपक्रमाबद्दल भाष्य करतांना श्री.विजय गोलानी म्हणाले की,”कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे पूर बाधित भागात सामान्य परिस्थिती परत आणण्याच्या प्रयत्नांचे आम्ही मनापासून कौतुक करतो. या कठीण परिस्थितीत, अँमवे एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे तसेच छोट्या पण अर्थपूर्ण मार्गाने मदत कार्यात व्यापक पाठिंबा देण्यास वचनबद्ध आहे”.

सर्व मूलभूत संसाधने एकत्रित करून, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह, अँमवे डायरेक्ट सेलर्स द्वारे या किट्स चे वितरण करणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *