Thursday, 12 Dec 2019

अयोध्येतील राम मंदिरासाठी शिया वक्फ बोर्डाकडून देणगी!

उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी 51 हजार रूपयांची देणगी जाहीर केली आहे. बोर्ड मंदिर उभारणीच्यादृष्टीने सकारात्मक आहे, असं रिझवी यांनी सांगतिलं आहे.
अनेक दशकं चाललेल्या या खटल्यावर अखेरीस सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. हा तिढा सोडवण्यासाठी हा एकमेव मार्ग होता. आता भारतात रामजन्मभूमीवर जगातील सर्वात सुंदर मंदिर उभारण्याचं कार्य सुरू होत आहे.
दरम्यान, भविष्यात राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर शिया वक्फ बोर्डाच्यावतीने त्यात देखील मदत केली जाईल, अयोध्येतील राम मंदिर संपूर्ण जगभरासह भारतातील राम भक्तांसाठी गर्वाची बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *