Wednesday, 16 Oct 2019

सर्व पक्षीयांचा निर्धार : मिनिट्रेन लवकरच सुरू केली नाही तर मतदानावर बहिष्कार

माथेरान प्रतिनिधी :- दरड कोसळल्याच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली माथेरान मिनिट्रेनची शटल सेवा दिवाळीच्या हंगामापुर्वी सुरू केली नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण माथेरान कर हे ह्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकणार असे आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत स्पष्ट झाले आहे.
माथेरान पर्यटन नगरीची जीवनवाहिनी येथे कोसळलेल्या मुसळधार पावसाने अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा तडकाफडकी निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला त्याचा परिणाम येथील व्यवसायावर जाणवू लागला आहे त्यामुळेच निदान अमनलॉज ते माथेरान शटलसेवा दिवाळीपूर्वी सुरु व्हावी या करिता आज माथेरानमधील नागरिकांनी येथील मध्यवर्ती राममंदिर येथे सर्व नागरिकांची बैठक बोलवून रेल्वे प्रशासनाला हि सेवा लवकर सुरु करावी ह्या करिता एका बैठकीचे आयोजन केले होते त्यास माथेरानमधील सर्वच थरातील नागरिकांनी उपस्थिती लावली . माथेरानचे पर्यटन हे नेरळ माथेरान मिनीट्रेन सेवेवर अवलंनबून असल्याचे नेहमीच निदर्शनास आलेले आहे हया वर्षी ही ह्या मार्गावर पुन्हा एकदा दरड माती कोसळल्याने, व काही ठिकाणी रेल्वे खालील भाग खचल्याने रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवणार असल्याची घोषणा केली होती त्यास माथेरानकरानी विरोध करताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन निदान शटलसेवा तरी सुरु रहावी अशी मागणी केली होती व त्यास रेल्वे बोर्डाने सकारात्मकता दाखवत हि सेवा सुरु करण्याकरिता अमनलॉज ते माथेरान ह्या मार्गाची पाहणी करून काही तांत्रिक अडचणी दूर करून हि सेवा सुरु करण्याची तयारी दर्शविली होती त्यास आता अनेक दिवस होऊन गेले आहेत पण ह्या मार्गावर अजूनही कोणतेही काम सुरु झालेले नाही माथेरानमध्ये इंजिनाच्या व बोगींच्या दुरुस्तीसाठी लोकोशेड असावे असे रेल्वेच्या एका समितीने सुचविले होते त्या कामास हि अजून मुहूर्त सापडलेला नाही दिवाळी हंगाम समोर येऊन ठेपला असताना रेल्वे प्रशासनाकडून अजूनही काहीही प्रतिसाद लाभत नसल्याने माथेरान पर्यटन व्यवसायावर चिंतेचे वातावरण आहे,ह्यावर मार्ग काढण्यासाठी आज येथील राममंदिर चौकात माथेरानमधील सर्व राजकीय पक्ष,व्यापारी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी एकत्र येऊन ह्यावर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते ह्या बैठकीस माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत उपनगराध्यक्ष आकाश चौधरी माजी नगराध्यक्ष अजय सावंत मनोज खेडकर,शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी,गटनेते प्रसाद सावंत, बबिता शेळके,विलास पाटील माथेरानमधील सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते ह्यावेळी सोमवारी माथेरानकरांच्या सह्यानिशी रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना शटलसेवा सुरु करण्याविषयी निवेदन देण्याचे ठरविण्यात आले व त्यावर काहीही तोडगा न निघाल्यास आगामी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात यावा असे ठरविण्यात आले.
————————–————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *