Friday, 22 Nov 2019

भारतात येणाऱ्या संकटां विषयी जागरूक होण्याची गरज डॉक्टर सुभाष देसाई यांचे ज्येष्ठ नागरिक संघामध्ये भाषण

गारगोटी:- “दिवसेदिवस बिघडत चाललेल्या पर्यावरणामुळे ओल्या आणि कोरड्या दुष्काळाची भीती महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पसरली आहे ही एक प्रकारच्या भारतातील येणाऱ्या जल संकटाची नांदी आहे त्याविषयी ज्येष्ठ नागरिकांनी समाजात जागृती आणण्याची गरज आहे इजराइल देश वाळवंटामध्ये नंदनवन फुलवतो एकाच विद्यापिठात 9 नोबेल पारितोषक मिळवतो आणि सतत संघर्षाच्या काळात ही स्वाभिमानाने स्वावलंबी बनतो यापासून आपण बोध घ्यायला हवा “असे चिंतनीय उदगार डॉक्टर सुभाष देसाई यांनी ‘मी पाहिलेला इस्राईल’ या विषयावर बोलताना गारगोटीच्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सभागृहात बोलताना मांडले अध्यक्षस्थानी श्री कारखानीस सर होते यावेळी डॉक्टर सुभाष देसाई यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला
या कार्यक्रमाला श्री मौनी विद्यापीठाचे माजी संचालक डॉक्टर माळी, प्राध्यापक बाळ देसाई कोयना एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर सोपानराव चव्हाण ,डॉक्टर मोमीन व इतर मान्यवर उपस्थित होते .याप्रसंगी डॉक्टर मा.गो. माळी यांचा ८८वया
वाढदिवसानिमित्त संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. बी. पाटील यांनी केले व आभार श्री देसाई यांनी मानले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला वर्गही उपस्थित होता यावर्षीचा भुदरगड भूषण पुरस्कार कम्युनिस्ट कार्यकर्ते श्री दत्ता मोरे यांना जाहीर करण्यात आला त्याचप्रमाणे इतर पुरस्कारही जाहीर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *