Thursday, 12 Dec 2019

भारतीय जनता पार्टीच्या आघाड्यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोचवा : डॉ.विकास महात्म्ये यांचे प्रतिपादन

कोल्हापूर :- भाजपा जिल्हा कार्यालयात आज ओ.बी.सी, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती यांचा मेळावा संपन्न झाला. भाजपा निवडणूक अभियान वर्गवार समाज संमेलन प्रमुख पद्मश्री डॉ.विकास महात्म्ये (राज्यसभा खासदार) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले . यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सुभाष रामुगडे, अनुजा मोर्चा अध्यक्ष यशवंत कांबळे, सरचिटणीस अनिल कामत, ओबीसी मोर्चा अध्यक्ष संदीप कुंभार, भटके विमुक्त जाती अध्यक्ष भरत काळे, संतोष आव्हाड, रामकिशनजी रोंदळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी डॉ.विकास महात्म्ये यांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे आपले मनोगत व्यक्त करतना म्हणाले, भाजपा कोल्हापूर मधील सर्व आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एक परिवार म्हणून समाजाचे, पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने करून पक्ष वाढीसाठी नवनवीन लोक जोडण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
आपल्या मनोगत व्यक्त करताना डॉ.विकास महात्म्ये म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने राज्यातील अनुसूचित जाती जमाती, भटक्या विकुक्त जाती यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे. गेल्या ५ वर्षात लोकहिताचे अनेक निर्णय या सरकारने घेतले आहेत. मराठा आरक्षणा बरोबर इतर अनेक योजनांच्या माध्यमातून वंचित घटकांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळवून दिला आहे. आपल्या आघाडीच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शासनाच्या विविध योजना सर्व सामान्य नागरिकांच्यापर्यंत पोचवणे गरजेचे असल्याचे नमूद केले. विविध आघाड्या या पक्षाची खूप मोठी ताकद असून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आघाड्यांमार्फत योग्य नियोजन करून यशामध्ये मोठे भागीदार कसे होता येईल यासाठी मार्गदशन केले. यावेळी सर्व आघाडी प्रमुख व धनगर संघर्ष समितीतर्फे डॉ.विकास महात्म्ये यांचा पारंपारिक धनगरी घोंगडे-काठी देऊन कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिल कामत यांनी केले. यावेळी गटनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवीका अश्विनी बरामते, सविता भालकर, मनीषा कुंभार, अभी पोवार, सचिन काकडे, अरविंद वडगावकर, प्रकाश कालेकर, विद्या बनछोडे, चिनार गाताडे, श्रद्धा मेस्त्री, छाया शिंदे, संध्या तेली आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *