Friday, 22 Nov 2019

एअर इंडियाच्या १२० वैमानिकांचा राजीनामा

नवी दिल्ली : अर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियासमोर नवे संकट उभे राहिले आहे. वारंवार मागणी करुनही पगार आणि पदोन्नती न मिळाल्याने कंपनीच्या 120 वैमानिकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. एअरबस ए- ३२० चे सर्व वैमानिक आहेत.

एअर इंडियावर कंपनीवर केंद्र सरकारचे ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज असताना वैमानिकांनी राजीनामा दिली आहे. 120 वैमानिकांनी एकाच वेळी राजीनामा दिल्याने कंपनी मोठ्या संकटात सापडली आहे.

राजीनामा देणाऱ्या वैमानिकाने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, व्यवस्थापनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. वेतनवाढ आणि पदोन्नती या दोनच मागण्या होत्या. वारंवार मागणी करुनही या पूर्ण न झाल्याने आम्ही हे पाऊल उचलले आहे.

कंपनीकडून वैमानिकांशी पाच वर्षाचा करार करण्यात येतो. करारानुसर वैमानिकांना कमी पगारवर ठेवण्यात येते. पाच वर्षात वेतन वाढ होईल किंवा पदोन्नती मिळेल अशी आमची अपेक्षा होती परंतु ती आम्हाला मिळाली नाही. तसेच पगारही वेळेवर होत नाही. व्यवस्थापनाकडे या विषयी अनेकदा तक्रार देखील केली मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. व्यवस्थापनाच्या या ढिसाळ कारभाराला कंटाळून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे वैमानिकाने सांगितले.

सामूहिक राजीनाम्यानंतर विमानांच्या फेऱ्यावर कोणताही फरक पडणार नाही. सध्या एअर इंडियाकडे 2000 वैमानिक असून त्यातील 400 वरिष्ठ वैमानिक आहे, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

आगामी काळात इंडिगो एअर, गो एअर, विस्तारा आणि एअर आशिया या विमान कंपन्यामध्ये एअरबस ए- ३२० साठी भरती होणार आहे. त्यामुळे राजीनामा दिलेल्या वैमानिकांना अनेक संधी उपलब्ध आहेत.

________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *