Friday, 22 Nov 2019

ग्रंथालयाकडे पाठ : मोबाईल मुळे वाचनसंस्कृती पावते लोप

माथेरान:- सध्याच्या मोबाईल युगात प्रत्येकजण एवढा व्यस्त झाला आहे की त्याला वाचनाची गोडी आणि आवड निर्माण होत नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून वाचकांच्या सेवेसाठी उपलब्ध असणाऱ्या नगरपरिषदेच्या एकमेव करसदास मुळजी वाचनालयाकडे कुणीही फिरकताना दिसत नाही.तर तरुण पिढी मोबाईल मध्ये व्यस्त असल्याने वर्तमानपत्र, विविध प्रकारची ज्ञानात भर घालणारी पुस्तके कुणीही वाचताना दिसत नाहीत. तर विशेष म्हणजे जेष्ठ नागरीक हीच मंडळी आवर्जून वर्तमानपत्र खरेदी करून वाचत आहेत.निसर्गाच्या सानिध्यात गावाच्या मध्यवर्ती भागात हे वाचनालय पूर्वापार सेवा उपलब्ध करून देत आहे. जवळपास १२००० मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेतील पुस्तके त्याचप्रमाणे मोठा ग्रंथ समूह वाचनासाठी उपलब्ध आहे. तर मागील काळात मुंबई येथील रहिवासी माथेरान प्रेमी प्रदीप पुरोहित यांनी विविध भाषेतील भगवद्गीता ग्रंथ देणगी स्वरूपात दिलेले आहेत.
या भव्य वाचनालयात जेमतेम वीस सभासद असून चार ते पाच वाचक नियमितपणे येत असतात यामध्ये अमोल चौगुले हे नित्याचेच वाचक आहेत.परंतु सध्याची पिढी ही मोबाईलच्या अधीन गेल्यामुळे वाचनसंस्कृती जवळजवळ लोप पावत चालली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *