Thursday, 12 Dec 2019

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त दसरा चौकात रॅली

कोल्हापूर: राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2019 रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, शिवाजीराव परुळेकर, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील, अन्सारी सर, कोजिमाशि पतसंस्थेचे संचालक अनिल चव्हाण, प्राध्यापक जाधव सर, राजेश वरक, कॉम्रेड अनिल चव्हाण आदी मान्यवरांसह नेहरू हायस्कूल, मुस्लिम बोर्डींग पदाधिकारी, आंतरभारती शिक्षण मंडळ, वि. स. खांडेकर प्रशाला , कोरगावकर हायस्कूल , शा कृ पंत वालावलकर हायस्कूल ,माझी शाळा, समता हायस्कूल आदी शाळातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधीजी अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या. गांधीजींचा सर्वसमावेशक विचारच या देशाला तारू शकेल अशा भावना अनेक वक्त्यांनी मांडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *