Saturday, 23 Nov 2019

बारामतीच्या कृषी प्रदर्शनाला अवश्य भेट द्या

महाराष्ट्र शासनातर्फे कृषी विभागाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा” आत्मा “पुणेतर्फे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान सुरू केले आहेव त्याच्यामध्ये परंपरागत कृषीविकास सेंद्रिय शेतीने कसा करतात ही मुख्य कल्पना आहे. यामध्ये ३५० स्टॉल्स उभा राहिलेले आहेत एकशे दहा एकरावर प्रत्यक्ष शेती वाफे उभारलेले आहेत .हे भव्य प्रदर्शन चार विभागांमध्ये ऊभारलेले दिसते. हर्बल वनस्पती, कडधान्य ,खते, मशिनरी ,मत्स्य विभाग अशांनीही प्रदर्शन संपन्न अाहे. दररोज महाराष्ट्राच्या विविध भागातून लाखो शेतकरी या ठिकाणी येतात . बारामती शहरापासून साधारण तीन चार किलोमीटर अंतरावर नैसर्गिक वातावरणामध्ये हे प्रदर्शन भरले.
या प्रदर्शनामध्ये तरुण पिढीच्या उत्साहाने भाग घेतलेला पाहून महाराष्ट्राचया कृषी धोरणाला भवितव्य चांगल आहे असं मनाला वाटते
या प्रदर्शनातून फिरताना मला संभाजी धोंडिराम बोराडे कृषिभूषण मुक्काम शेगाव तालुका जत सांगली हे भेटले स्टाल मांडलेला आहे त्यामध्ये कोरफड जूस आणि संजीवनी शेती फळरसविक्रीसाठी ठेवलेला आहे. त्याची गुणवत्ता फार चांगली .सुरुवातीला कोणी येत नव्हते हळुहळु काही वर्षे त्यांना चांगला प्रतिसाद मिळु लागला. जागतिक बँकेने त्यांना दहा लाखांचे अर्थसाह्य केले त्यासाठी सीएकडून प्रकल्प तयार करून घेतला एकून सत्तावीस उत्पादने आहेत काम करुन लाखो रुपये मिळतात .
धन्वंतरी आवळा कंपनी आहे त्याचे कुशावर्त जाचक आणि त्यांच्या सुविध पत्नी सुमन जाचक त्या इंदापूरच्या आहेत त्या भेटल्या आवळ्याच्या विविध प्रकारचे उत्पादने त्यांनी विक्रीसाठी ठेवली आहे त्यामध्ये कोरडा आवळा ,आवळा चहा ,आवळा सॉस ,आवळा सुपारी, आवळा जाम असे विविध उत्पादने मराठा समाजातल्या महिला सुद्धा उद्योजक बनुन पुढे येताना पाहिल्यानंतर आनंद होतो.
सारिका वांद्रे नावाची मुलगी मूळ कोवाड कोल्हापूरमध्ये आहे ती या भागामध्ये सोशल मीडियाचा द्वारे तरुण पिढीला कृषी क्षेत्रातील नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेणारा एक गुरूप चालवतात
शेती करण्यासाठी सर्व काही सहज उपलब्ध असताना भरघोस उत्पादन काढणे सहज शक्य असते परंतु रोज नवीन संकटाला तोंड देत शेती करणारा शेतकरी खरा यशोगाथेचा मानकरी असतो
शेती करताना भेडसावणारा प्रश्न ह्मणजे व्हायरसचा प्रादुर्भाव .त्यावर या प्रदर्शनामध्ये परफेक्ट सारख्या अनेक कंपन्या यांमध्ये पिके रोगमुक्त करण्यासाठी पुढाकार घेता। मिरचीवर चुरडा मुरडा प्रकाश विभागावरील तांबेरा सूर्य फळावर करपा, कोथिंबिरी वरील मावा, कापसावरील पांढरी माशी, कांद्यावरील फुलकिडे अशा विविध किड्यांच्या वरती औषधे उपलब्ध आहेत
अजित सिडस याऔरंगाबादच्या कंपनीने भाजीपाला माहिती पुस्तिका काढलेलीे आहे त्यामध्ये संकरित भेंडी. संकरीत विविध प्रकारचा जाती संकरित मिरची , विराट वांगी ठेवलेली आहे केंद्र व राज्य शासन मान्यता प्राप्त युती संवर्धित केळी राेपेही उपलब्ध आहेत. फर्टिनेशनसाठी खतांची मात्राचे वेळापत्रक आणि पारंपरिक खतांचे व्यवस्थापन यांचे मार्गदर्शनात केले गेले.
याच प्रदर्शनात गुजर मारवाडी जर आपला धंदा न करतील तर आश्चर्य कसले? “मातीतून पिकले सोन त्याला गुंतवणुकीचा कोंदन हवं” असं म्हणत आपल्या विविध सोने चांदीच्या हिंसाही शेतकऱी कुटुंबीयांपुढे ठेवायला ते लोक विसरलेले नाहीत .हे खरे मार्केटिंग !
तुम्ही बारामती आणि बारामती वरील पवार कुटुंबीयांनी दूरदृष्टीने उभारलेलं हे शेतीचा हे प्रचंड व्यापक ज्ञानाचं भांडार पहावेच. हे महाराष्ट्राचे वैभव आहे .
डॉ.सुभाष देसाई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *