Saturday, 23 Nov 2019

प्रा .आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेच्या निषेधार्थ दादरला आंदोलन

.
मुंबई / ( एन.डी. चाळके ) : मोदी सरकारने विचारवंतांचा आवाज दाबण्याचे काम सुरू ठेवले आहे . प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना भीमा कोरेगाव च्या कटात जाणीवपूर्वक अडकवून त्यांना नुकतेच पुणे पोलिसांनी अटक केली . या अटकेच्या निषेधार्थ नवजवान भारत सभा ,मजदूर दस्ता, मार्क्सवादी-लेनिनवादी पक्ष, रिपब्लिकन सेना, भारत बचाव आंदोलन पक्ष व संघटनांच्या वतीने मुंबईतील दादर रेल्वे स्थानकासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली .यावेळी भारतीय संविधान धोक्यात आहे, सरकार जाणीवपूर्वक बुद्धीजिवी व विचारवंतांना अटक करून विचारवंतांचा आवाज दाबून ठेवत आहे .नवजवान भारत सभा , बिगुल मजदूर रस्ता, मार्क्सवादी-लेनिनवादी पक्ष, रिपब्लिकन सेना ,भारत बचाव आंदोलन आणि एस यु सी आय विविध पक्ष व संघटनांच्या वतीने दादर रेल्वे स्थानकासमोर शनिवार दि .९ फेब्रुवारी रोजी तीव्र निदर्शने व घोषणा देण्यात आल्या .सरकारच्या दडपशाहीच्या धोरणाला अजिबात झुकणार नाही . तितक्याच तीव्रतेने त्याचा प्रतिकार केला जाईल ..सत्तेचा दुरुपयोग करून सरकार व्यक्ति स्वातंत्र्यावर गदा आणत आहे . लोकशाही मार्गाने याला तीव्र विरोध केला जाईल असा निर्धार यावेळी विविध पक्ष-संघटनांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला . याप्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *