Thursday, 12 Dec 2019

नेमबाज उज्वल पाटील यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधि :नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व ऑरेंज सिटी शूटिंग क्लब नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विभागीय क्रीडा संकुल नागपुर येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय एअर रायफल व पिस्टल नेमबाजी स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये जी एस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी व प्रतिभावंत नेमबाज उज्वल सुनील पाटील यांनी 17 वर्षाखालील गटात नेमबाजीत एपी प्रकारांमध्ये 400 पैकी 344 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. नेमबाज उज्वल पाटील यांची निवड विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी करण्यात आलीआहे. उज्वल सुनील पाटील हा कोल्हापूर जिल्ह्यातील कौलव ता. राधानगरी या गावचा रहिवाशी असून शिक्षक नेते व कोजिमाशि पतसंस्थेचे तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांचा तो नातू आहे. उज्वल पाटील याच्या या घवघवीत यशाबद्दल शाळा ,महाविद्यालय व शिक्षण क्षेत्रातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *