Friday, 22 Nov 2019

गरुडभरारी फौंडेशनचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर .

वर्धापनदिनानिमित्त १४ मान्यवरांचा पुरस्कार देऊन होणार गौरव .
कोल्हापूर : गरुडभरारी एज्युकेशनल अॅण्ड सोशल फौंडेशनचा व साप्ताहिक गरुडभरारीचा ८ वा वर्धापनदिन सोहळा रविवार दि . ३० डिसेंबर ,२०१८ रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे दु .१२वा . मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे . यावेळी गरुडभरारी शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशन, वेबसाईटचे उद्घाटन व विविध क्षेत्रातील महनीय १४ व्यक्तींना राज्यस्तरीय गरुडभरारी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे . यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ . चंद्रकुमार नलगे ( साहित्यरत्न पुरस्कार ), शिक्षण उपसंचालक कार्यालय शिक्षण निरीक्षक डी .एस. पोवार ( आदर्श प्रशासकीय सेवा पुरस्कार ), श्री .किसान शिक्षण प्रसारक मंडळ कोतोली संस्थापक डी .जी पाटील ( आदर्श संस्थापक पुरस्कार ), पशूविकास अधिकारी वर्ग – अ हातकणंगले येथील डॉ . अनिता दिपक कदम ( पशूवैद्यकीय सेवा पुरस्कार ), डेंटल सर्जन डॉ . रमेश पोरवाल ( उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरस्कार ), दै . लोकमत उपसंपादक क्राईम एकनाथ रा .पाटील ( निर्भिड पत्रकार पुरस्कार ), सोनी इंजिनिअर्स शिरोलीचे प्रमुख बाबासाहेब म .कदम ( उद्योगरत्न पुरस्कार ), श्री .शिवशंकर माध्यमिक विद्यालय अमेणी मुख्याध्यापक बाबासाहेब तु . पाटील ( आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार ), सूळकूड हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक इकबाल मेहबूब मुजावर ( आदर्श शिक्षक पुरस्कार ), शेलाजी व . संघवी विद्यालय कोल्हापूर सहाय्यक शिक्षिका सौ . सुनिता नागेश हंकारे ( आदर्श शिक्षिका पुरस्कार ), के.बी.एस. कन्स्ट्रक्शन नागावचे प्रमुख कृष्णात बापू सातपुते ( उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक पुरस्कार ), आयुष फौडेशन वारणा कापशी संस्थापक अमोल बंडू गायकवाड ( जीवनगौरव पुरस्कार ), दिनकर रामचंद्र चव्हाण परिवार मुरगूड( आदर्श कुटूंब पुरस्कार ), बारवाड ता . निपाणी येथील ५५ लोकांचे कुटुंब प्रमुख शशिकांत महादेव अर्जुनवाडे ( आदर्श एकत्र कुटूंब पुरस्कार ) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे .मानपत्र, गौरवचिन्ह ,कोल्हापूरी फेटा, शाल, पुष्पगुच्छ व राजर्षी शाहू चरित्रग्रंथ असे पुरस्काराचे स्वरुप आहे . कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कोल्हापूरच्या महापौर सौ . सरिता मोरे असून अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादासाहेब लाड हे आहेत . प्रमुख वक्ते ज्येष्ठ विचारवंत डॉ . सुभाष के . देसाई यांचे प्रसारमाध्यमांची आजची जबाबदारी या विषयावर व्याख्यान होणार आहे . कार्यक्रमास उपमहापौर भुपाल शेटे, निवृत्त कार्यकारी अभियंता डी . वाय . कदम, निवृत्त नौसेना अधिकारी एन .डी . चाळके आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत . कार्यक्रमास समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन गरुडभरारीचे संस्थापक अनिल चव्हाण, संचालक सुनिल चव्हाण, रविंद्र मोरे यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *